राष्ट्रवादीत अर्थमंत्रालय सांभाळण्याच्या पात्रतेचे कोणी नाही

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते सांभाळणारा कोणताही नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसल्याची जाणीव असल्याने यासंदर्भात कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. दिलीप वळसे-पाटील वगळता अर्थ खात्याचा आवाका असलेला नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थव्यवहार आणि या खात्यातील घडामोडी, दैनंदिन व्यवहार झेपण्याची शक्यता नसल्याने सध्या हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सांभाळावे लागेल. याची राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतेक सर्वांना कल्पना आहे.

उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्यात सुनेत्रा पवार उत्तमप्रकारे मेहनत घेत आहेत. त्यांच्याकडे असलेले अबकारी कर (एक्साईज) हे खातेही मोठे असल्याने त्यांनी लगेचच अर्थखाते मिळावे अशाप्रकारची कोणतीही मागणी उघड किंवा आडून केली नसल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत सरकारचा कारभार सहका-यांकडून समजून घेणे आणि पक्षकार्यात लक्ष घालण्यावर सुनेत्रा पवार लक्ष देतील, असे निकटच्या मंडळींनी सांगितले. येत्या काही महिन्यांत त्यांनी पक्ष आणि कारभारावर पकड मिळवली की, त्यांना अधिक मोठे खाते देण्यावर विचार होऊ शकेल. यासंदर्भात स्वत: देवेंद्र फडणवीस काही उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याची शक्यता आहे. युतीत तीन सहकारी पक्ष असताना निधीचे वितरण ही मोठी समस्या असते. प्रत्येक पक्षाचे समाधान करत आमदारांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस पेलू शकतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तसेच अजित पवार असतानाही अर्थ खात्याच्या सर्व फायली फडणवीस यांच्या माध्यमातून समोर जात असत, असेही एका ज्येष्ठ नेत्याने लक्षात आणून दिले.

‘अर्थ’ नाही तर ‘महसूल’
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते देणे शक्य नाही; पण निदान महसूल, ऊर्जा-ग्रामविकास असे एखादे दमदार खाते दिले जावे, ही मागणी समोर केली जाणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. मनोज शिरूरे अटकेत;CBI ची मोठी कारवाई
03:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. शिरूरेनं मोटेगावकरला पेपर विकला?;मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
03:01
Video thumbnail
Latur|तोंडार पाटीजवळ दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग;अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
01:19
Video thumbnail
इंडिगो पायलटच्या कॅमेऱ्यात कैद भारत-पाक सीमेचे विलोभनीय रूप, रात्रीच्या झगमगाटाचा व्हिडिओ व्हायरल!
00:33
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42

Latest news