27.5 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमहादेव बेटिंगअ‍ॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

महादेव बेटिंगअ‍ॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

मुंबई : अभिनेता साहिल खानला त्याच्या लग्झरी लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता साहिल बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी साहिल खानला महादेव बेटिंग अ‍ॅपचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी साहिलने मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला यानंतर मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) साहिलला छत्तीसगडमधून अटक केली.

यापूर्वी एसआयटीने साहिल आणि इतर तिघांना डिसेंबर २०२३ मध्ये चौकशीसाठी बोलावले होते, परंतु तो चौकशीला हजर झाला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, साहिलने केवळ अ‍ॅपचा प्रचार आणि प्रसार केला होता आणि बेटिंग अपॅशी थेट संबंध नाकारला होता. मात्र, तो लॉटस बुक २४ /७ या बेटिंग अ‍ॅपचा सहमालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. साहिलला अटक केल्यानंतर रायपूरमार्गे मुंबईत आणले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, साहिलने जामीन अर्जात सांगितले की त्याचा करार २४ महिन्यांसाठी होता, ज्यामध्ये त्याच्या सोशल मीडियावर प्रमोशन व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ३ लाख रुपये मासिक मानधन देण्याचे ठरले होते. असे असतानाही बेकायदेशीर कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे कारण देत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे माटुंगा येथे साहिल खान याच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR