क्रिकेटमधून अजिंक्य रहाणे निवृत्त

मुंबई : प्रतिनिधी
भारताचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हीडीओ पोस्ट करत अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली.
अजिंक्य रहाणेने ८५ कसोटी सामन्यांत ५ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १८८ इतकी राहिली आहे. त्याच्या नावावर १२ शतके आणि २६ अर्धशतके आहेत. वनडेमध्ये त्याने ८७ डावांत २९६२ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके, २४ अर्धशतके ठोकली आहेत. अजिंक्य रहाणे याने २० टी-२० मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. २० डावांत त्याला फक्त ३७५ धावाच करता आल्या, त्याच्या नावावर फक्त एका अर्धशतकाची नोंद आहे.

अजिंक्य रहाणेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक व्हीडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. या व्हीडीओसोबत रहाणेने लिहिले, कॅप २७८ आता निरोप घेत आहे. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा मी कायम ऋणी राहीन.

गेल्या काही वर्षांपासून रहाणे टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये खेळला होता. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये तो शेवटचा भारतीय जर्सीत मैदानात उतरला होता. त्याआधी त्याने अखेरचा वनडे सामना २०१८ मध्ये तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला होता.

अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर नजर टाकली तर त्याने भारतासाठी ८५ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने १४४ डावांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने आणि ४९.५० च्या स्ट्राईक रेटने ५,०७७ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकली. कसोटीतील त्याची सर्वोच्च खेळी १८८ धावांची होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01
Video thumbnail
Latur|हैदराबाद-विजयवाडा अभ्यास दौऱ्यावर 27 नगरसेवक; बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोठी तयारी!
03:22
Video thumbnail
जळकोटजवळ अपघाताचा दृश्य , कारच्या अवस्था पाहून चिंता व्हाल #accident #maharashtra
00:23
Video thumbnail
Nanded|हळदीला कमी भाव; संतप्त शेतकऱ्यांनी लिलावच बंद पाडला!
05:14
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50

Latest news