36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeपरभणीअक्षय्य हिंदूू पुरस्कार ऋषिकेश सकनुर यांना जाहीर

अक्षय्य हिंदूू पुरस्कार ऋषिकेश सकनुर यांना जाहीर

परभणी : हिंदूंनी ंिहदूंसाठी केलेल्या कामासाठी हिंदू समाजाकडून कृतज्ञता म्हणून दिल्या जाणा-या अक्षय्य हिंदू पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. लोकसहभागातून उभा राहिलेला अशा स्वरूपाचा हा पहिलाच पुरस्कार आहे. दुस-या अक्षय्य हिंदू पुरस्काराचे काल विजेते घोषित झाले आहेत. यावर्षी समितीकडे जवळजवळ दोनशे नामांकने महाराष्ट्र, गोवा, केरळ, छत्तीसगढ, पंजाब, दिल्ली, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि कर्नाटक या विविध राज्यांतून प्राप्त झाली होती. त्यात ऋषिकेश सकनुर यांच्या नावाची निवड काल पुरस्कार समितीकडून करण्यात आली.

पुरस्कार १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथे ऍड. विष्णू जैन यांच्या हस्ते दिले जातील. सदरील कार्यक्रमाचे आयोजन एसपी कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सकनुर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध हिंदुत्ववादी चळवळींमध्ये सहभागी आहेत. जातिभेद निर्मूलन, समतायुक्त समाज यासाठी ते गेली १५ वर्ष काम करतात. त्यात प्रामुख्याने संत चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची मंगळवेढा ते देहू या समता वारीच्या आयोजनात त्यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सकनुर यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR