आता सर्व पत्रव्यवहार ई-ऑफिसमधून होणार

नांदेड : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेने प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशाने डिजीटल निर्णय घेतला आहे. यानूसार आता सर्व विभागांनी आता ई-ऑफिस प्रणालीद्वारेच फाईल व टपाल व्यवहार केले जाणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी नुकतेच सर्व विभागांना निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे शासकीय ई-मेल आयडी तयार करण्यात आले असून, यापुढे कार्यालयीन पत्रव्यवहार, टपाल तसेच फाईलची देवाण-घेवाण ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गार्तील एकूण ८८१ कर्मचा-यांपैकी ७७२ जणांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक ई-फाईल्स तयार करण्यात आल्या असून ५२ हजार ४२१ टपालांचा ई-ऑफिसद्वारे व्यवहार करण्यात आला आहे.
ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कार्यक्रम प्रमुख कुलदीप जोशी समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनीही सर्व विभागप्रमुख व अधिका-यांना टपाल व पत्रव्यवहार ई-ऑफिसद्वारेच करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news