37.7 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयशेख हसीना यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर

शेख हसीना यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर

बांगलादेशात जाळपोळ सरन्यायाधीशांच्या घरावरही हल्ला

ढाका : बांगलादेशात शनिवारी विरोधकांच्या रॅलीदरम्यान हिंसाचार पसरला. यानंतर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, ज्यामध्ये एका पोलिस अधिका-याचा मृत्यू झाला. या हिंसाचारात सुमारे १०० लोक जखमी झाले आहेत.

वास्तविक बांगलादेशमध्ये पुढील वर्षी जानेवारीत निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी काळजीवाहू सरकार स्थापन करावे, अशी बीएनपीची मागणी आहे. बांगलादेश मीडिया डेली स्टारच्या मते, गेल्या ४५ महिन्यांतील हे सर्वात मोठे प्रदर्शन होते. शनिवारी विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनादरम्यान बराच गदारोळ झाला. यादरम्यान देशाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताच ककरेल चौक, सर्वोच्च न्यायालय परिसर आणि सरन्यायाधीशांच्या निवासस्थानासमोर चकमक उडाली.

रॅलीदरम्यान हिंसाचार कसा पसरला?
अवामी लीगचे काही कार्यकर्ते दोन पिकअप व्हॅनमधून त्यांच्या रॅलीला जात असताना हिंसाचार सुरू झाला. बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून पिकअप व्हॅनची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी बीएनपीच्या एका कार्यकर्त्याला अटक केली. हळूहळू बीएनपीचे इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांशी झटापट झाली.

१३ वाहने, पोलिस चौकी जाळली
द डेली स्टारच्या वृत्तानुसार, ककरेल, नयापल्टन, विजयनगर, मालीबाग, आरामबाग भागात आणि मत्स्य भवनाजवळ झालेल्या चकमकींमध्ये किमान १३ वाहने आणि एक पोलिस चौकी जाळण्यात आली आणि डझनहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांचा आंदोलकांवर हल्ला
एएफपीच्या म्हणण्यानुसार, हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुर आणि रबर शॉटगनचा वापर केला. यावेळी आंदोलकांनी फुलिस यांच्यावर दगडफेक केली. या चकमकीत त्यांच्या युवा शाखेच्या एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाल्याचे बीएनपीने म्हटले आहे. हिंसाचाराचे वार्तांकन करणारे अनेक पत्रकारही जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR