23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeसोलापूरचोरीच्या उद्देशाने खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

चोरीच्या उद्देशाने खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

सोलापूर : चोरीच्या उद्देशाने खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला सदर बझार पोलिसांनी खब-या माहितीनुसार सापळा लावून त्याला जेरबंद केले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेला मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला. संतोष बाबुराव गुमटे याच्या खूनप्रकरणी गणपत ऊर्फ सुनील गायकवाड (पटवर्धन चाळ, रामवाडी) यास अटक केली.

सिमेंट गोदामाजवळ मोकळ्या मैदानात एका अनोळखीचा मृतदेह आढळून आला होता. खून झाल्यावर मृताचा भाऊ विजयकुमार गुमटे याने फिर्याद दिल्याने सदर बझार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदला होता. सहायक पोलिस निरीक्षक काटे यांच्याकडे तपास दिल्यानंतर शोध घेताना हा गुन्हा रेकार्डवरील गुन्हेगार गणपत ऊर्फ सुनील गायकवाड (पटवर्धन चाळ, रामवाडी) याने केल्याचे समजल्याने त्याला सापळा लावून अटक केली. तपासांत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पंचनाम्यात चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे, डीबी पथकाचे फौजदार नितीन शिंदे, सहा. फौजदार अनिता जाधव, हवालदार आटोळे, संतोष मोरे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, अय्याज बागलकोटे, महेश जाधव, सागर सरतापे, लक्ष्मीकांत फुटाणे, अर्जुन गायकवाड, मल्लू बिराजदार, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अबरार दिंडोरे, हणमंत पुजारी, गुणवंत अंगुले, सचिन राऊत, समीर शेतसंदी यांनी केली. अटक केलेला आरोपी हा रेकार्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासांत समोर आले. स्टेशनवर आलेल्या लोकांना गाठून तो मोबाईल चोरायचा. घटनेदिवशी मृत हा स्टेशनवरून पाठीमागच्या मार्गाने सिमेंट गोदामाजवळून जाताना नमूद आरोपीने त्याचा खून केल्याचे त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR