22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयराजौरीमध्ये आणखी एक जवान शहीद; दोन दहशतवादी ठार

राजौरीमध्ये आणखी एक जवान शहीद; दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीत आतापर्यंत २ अधिकारी आणि ३ जवानांनी प्राण गमावले आहेत. तसेच सुरक्षा दलांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रामसलच्या बाजीमल भागात बुधवारी रात्रभर थांबल्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. अतिरेकी घनदाट जंगलाच्या दिशेने पळून जाऊ नयेत यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांच्या मदतीने या भागाला रात्रभर घेराव घालण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान या भागात राहणा-या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराला सुरवातीला अडचणींचा सामना करावा लागला. डोंगराजवळील ढोकमध्ये राहणारे सामान्य लोक, विशेषत: महिला आणि लहान मुले यांना दहशतवाद्यांच्या गोळीबाराचा फटका बसण्याची शक्यता आहे, म्हणून लष्कराला त्यांच्या ऑपरेशन दरम्यान त्यांची सुरक्षा सुनिश्चित करायची आहे. तसेच या परिसराची भौगोलिक स्थितीही अवघड आहे. याठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी कमी असल्याने ऑपरेशनमध्ये अडचण निर्माण होत आहे. दहशतवादी लष्कराच्या कारवाईला प्रत्युत्तर देत असून सातत्याने गोळीबार करत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR