माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगरच्या फैजान ए-कन्झूल इमान या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए-रझा ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. तर चार जणांविरुद्ध माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दुजोरा दिला आहे.

इमरान कलीम शेख (सदर बाजार, अंबाजोगाई), मुज्जम्मिल नूर सय्यद (सत्तार गल्ली पात्रुड), अहमदुद्दीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज) व तौफीक जावेद काझी, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुज्जम्मिल नूर व अहमदुद्दीन काझी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या संदर्भाने मिळालेल्या माहितीनुसार वरील आरोपींनी पात्रुडमध्ये गुलजार ए रझा या नावाच्या ट्रस्टचा फलक लावला होता. निती आयोगाच्या नियमानुसार ट्रस्टची नोंदणी दर्पण पोर्टलवर करणे आवश्यक आहे. मात्र, गुलजार ए रझाचे चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये आढळून आले.

या न्यासाच्या नावाने लातूरमधील अ‍ॅक्सिस बँकेमध्ये पाच बोगस खाते तयार करण्यात आले होते. त्यामध्ये चार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. हा निधी धार्मिक कामाच्या संदर्भाने जमा करण्यात येत असल्याची माहिती आहे. गुलजार ए रझाची बीड जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांमधील दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती घेतली असता तेथेही त्यांची नोंदणी आढळून आली नाही.

महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांची डीड नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही वरील ट्रस्टची माहिती घेतली असता त्यांच्याकडे नोंदणी नसल्याचे कळवले आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे तो इम्रान शेख हा गुलजार ए रझा ट्रस्टचा अध्यक्ष, सय्यद मुज्जम्मिल हा उपाध्यक्ष, असमदुद्दीन कैसर काझी हा सचिव तर तौफीक काझी याचा विश्वस्त म्हणून बँकेच्या खात्यांमध्ये नोंदणी असल्याची माहिती पुढे आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news