चीनच्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’ मुळे अविवाहित तरूण उद्ध्वस्त?

बीजिंग : चीनमध्ये दीर्घकाळ ‘वन चाइल्ड पॉलिसी’ लागू होती. या धोरणामुळे देशात महिलांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आता अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. या संकटाचा फायदा घेत काही ठिकाणी तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

चीनमध्ये अनेक दशकांपासून लागू असलेल्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’ने आता देशातील तरुणांसमोर मोठे संकट उभे केले आहे. एकुलते मूल मुलगा असावे, या मानसिकतेमुळे आज चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सुमारे ३ कोटींनी अधिक झाली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळत नाही. अनेक जण मुलीच्या शोधात भटकत आहेत. याच परिस्थितीचा फायदा आता फसवणूक करणारे घेत आहेत. चीनमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ‘फ्लॅश मॅरेज’ म्हणजेच तातडीने लग्न लावून देण्याचे आश्वासन देणा-या बनावट विवाह संस्था आणि मॅरेज ब्युरो अविवाहित तरुणांना लक्ष्य करत आहेत. अशा एजन्सी काही दिवसांतच साधी आणि घरगुती मुलगी लग्नासाठी मिळवून देण्याचे आश्वासन देतात.

त्याबदल्यात पुरुषांकडून लाखो युआन उकळले जातात. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांत किंवा महिन्यांत नववधू पैसे घेऊन फरार होते. काही वेळा तर संपूर्ण लग्नच बनावट असल्याचे समोर येते. या परिस्थितीमुळे चीनमधील तरुणांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. अशीच एक घटना ३७ वर्षीय वांग झुआंग यांच्यासोबत घडली. या वयापर्यंत त्यांनी लग्नाची आशाच जवळपास सोडून दिली होती. मात्र, एके दिवशी त्यांना एका मॅरेज एजन्सीची जाहिरात दिसली. अखेर आपला वधूचा शोध संपणार, असे त्यांना वाटले. एजन्सीने चांगली मुलगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वांग यांनी एजन्सीची फी, वधूसाठीची रक्कम आणि लग्नाचा खर्च मिळून सुमारे ४४ हजार डॉलर दिले.

चीनमध्ये मुलींची कमतरता का निर्माण झाली?
चीनमध्ये दीर्घकाळ लागू असलेल्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’मुळे देशात महिलांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. सध्या चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सुमारे ३ कोटींनी अधिक असल्याचे सांगितले जाते. यामुळे वधूच्या कुटुंबीयांची मागणीही वाढली आहे. विशेषत: लहान शहरे आणि ग्रामीण भागात लग्नासाठी पुरुषांकडून घर, कार, कौटुंबिक व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात ‘ब्राइड प्राइस’ म्हणजेच वधूसाठी मोठी रक्कम मागितली जाते. या परिस्थितीचा फायदा घेत काही मॅरेज एजन्सी तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘३ दिवसांची भेट, ३ वर्षांच्या डेटिंगपेक्षा चांगली’ अशा प्रकारच्या जाहिराती करत आहेत. लग्नाची तीव्र इच्छा असलेल्या तरुणांना या जाहिरातींच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news