थकीत कर्ज थेट जामीनदारांकडून वसुलीचा बँकांना पूर्ण अधिकार

अलाहाबाद : मुख्य कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवल्यास, त्याच्याविरोधात प्रथम कारवाई न करता बँक थेट जामीनदाराकडून थकीत कर्जाची रक्कम वसूल करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती शेखर बी. सराफ आणि न्यायमूर्ती अवधेश कुमार चौधरी यांच्या खंडपीठाने भारतीय करार कायदा, १८७२ च्या कलम १२८ चा दाखला देत स्पष्ट केले की, जामीनदाराच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी ही मूळ कर्जदाराएवढीच असते. त्यामुळे बँक मूळ कर्जदार आणि जामीनदार या दोघांवर एकाच वेळी किंवा कोणा एकावरही कारवाई करण्यास स्वतंत्र आहे.

यूपी पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमधून विक्रांत दुबे या कर्मचा-याने २०२२-२३ दरम्यान सणासुदीचे कर्ज, अल्पमुदतीचे कर्ज आणि वैयक्तिक कर्ज अशी एकूण साडेएकवीस लाख रुपयांची कर्जे घेतली होती. त्याचे दोन सहकारी कर्मचारी या कर्जासाठी जामीनदार राहिले. विक्रांत याने कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने त्याच्यासह दोन्ही जामीनदारांविरोधात एकाच वेळी वसुलीची प्रक्रिया सुरू केली.

दोन्ही जामीनदारांची उच्च न्यायालयात याचिका
बँकेने जामीनदारांच्या टपाल विभागाला पत्र लिहून दोन्ही जामीनदारांच्या पगारातून प्रत्येकी १०,००० रुपये महिना वसूल करण्याची विनंती केली होती. या कारवाईविरोधात दोन्ही जामीनदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा भंग झाल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दावा केला की, बँकेने प्रथम मुख्य कर्जदाराविरोधात सर्व कायदेशीर मार्ग अवलंबले पाहिजेत. तेथून रक्कम वसूल न झाल्यास उरलेल्या रकमेसाठीच जामीनदाराकडे जाणे योग्य ठरेल. दोन्ही पक्षांवर एकाच वेळी वसुलीची कारवाई करणे हे जामीनकीच्या तत्त्वांविरुद्ध आहे, असा युक्तिवाद त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या राम किशन विरुद्ध यु.पी. राज्य खटल्याचा संदर्भ देऊन केला. तसेच, १५ एप्रिल २०२६ च्या वसुली पत्रापूर्वी कोणतीही सुनावणी न मिळाल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा भंग झाल्याचा दावाही त्यांनी केला.

जामीनदाराची जबाबदारी मूळ कर्जदाराएवढीच
न्यायमूर्ती शेखर बी. सराफ आणि न्यायमूर्ती अवधेश कुमार चौधरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केले की, करार कायद्याच्या कलम १२८ नुसार जामीनदाराची जबाबदारी ही मूळ कर्जदाराएवढीच आणि तात्काळ स्वरूपाची असते. बँक ऑफ बिहार, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत न्यायालयाने स्पष्ट केले की, जामीनदाराकडून वसुली करण्यापूर्वी मूळ कर्जदाराविरोधातील सर्व मार्ग संपवणे बँकेसाठी बंधनकारक नाही.

दोन्­ही जामीनदारांच्­या याचिका फेटाळल्­या
याचिकाकर्त्यांनी दिलेला राम किशन खटल्याचा संदर्भ त्यांच्याच विरोधात जाणारा असल्याचे सांगत न्यायालयाने स्पष्ट केले की, त्या निकालातही जामीनदाराला कारवाई रोखण्याचा अधिकार दिलेला नाही. जामीनदारांची जबाबदारी ही करारातून थेट निर्माण होते. त्यामुळे पगारातून कपात करण्यापूर्वी सुनावणी न मिळणे म्हणजे नैसर्गिक न्यायाचा भंग ठरत नाही, असे स्पष्ट करत कर्जाची परतफेड झाल्यानंतर जामीनदार स्वत:च्या नुकसानीची भरपाई मुख्य कर्जदाराकडून कायदेशीर मार्गाने मागू शकतात; परंतु बँकेला वसुली करण्यापासून रोखू शकत नाहीत, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने जामीनदारांच्या याचिका फेटाळून लावल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news