36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयअरविंदरसिंग लवली अखेर भाजपमध्ये

अरविंदरसिंग लवली अखेर भाजपमध्ये

नवी दिल्ली : दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंदरसिंग लवली हे चांगलेच चर्चेत आले होते. आगामी काळात ते काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते. या दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ते आज भारतीय जनता पक्षात सहभागी झाले आहेत. लवलीसिंग यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राजकुमार चौहान, अमित मलिक, नसीबसिंग आणि नीरज बसोया यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अरविंदरसिंग लवली यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंदरसिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यांनी प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया आणि काँग्रेसचे उमेदवार उदित राज, कन्हैया कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

तसेच त्यांना भाजपमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले असता लवी यांनी मी यापूर्वीही स्पष्ट केले होते आणि माझ्या राजीनामा पत्रात देखील स्पष्ट सांगितले होते की मला दुसरीकडे जायचे असेल तर एक वाक्याचा राजीनामा देण्यापासून कोण रोखत होेते, मी राजीनामा देण्याची कारणे यासाठी दिली की कदाचित ते दुरुस्त केले जातील. ज्या पद्धतीने लोकांना बाहेर काढले जात आहे ते पाहून दुख: झाले नसते तर पद का सोडले असते. मला कुठे पक्षातून बाहेर काढले जात होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR