37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभारतीय नौदलाने २० पाकिस्तानींना वाचविले

भारतीय नौदलाने २० पाकिस्तानींना वाचविले

चेन्नई : भारतीय नौदलने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. समुद्री चाचे असोत की मडिकल इमर्जन्सी भारतीय नौदल समुद्रात मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे पाहायला मिळते. अशीच एक घटना नुकतेच समोर आली आहे. भारतीय नौदलाने एका एमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देत २० पाकिस्तानी क्रू मेंबर्स असलेल्या मच्छिमारांच्या जाहजाला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली.

नौदलाने शनिवारी एक निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार एका एमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देताना अरबी समुद्रात समुद्री चाच्यांना रोखण्यासाठी तैनात असलेली आयएनएस सुमेधा मिशनने एका इराणी जहाजाला वैद्यकीय मदत पुरवली. या जहाजामध्ये २० पाकिस्तानी क्रू मेंबर्स देखील होते. नौदलाने सांगितलं की पॅट्रोलिंग शिप आयएनएस सुमेधाने ही मदत ३० एप्रिल रोजी केली. सूचना मिलाल्यानंतर लदेच एफवी अल रहमानीला थांबवण्यात आले, तसेच आमची मेडिकल टीम या इराणी जहाजावर पोहचली आणि चालक दलामधील एका सदस्याला तात्काळ उपचार देण्यात आले. त्याला श्वास घेण्यात अडचण येत होती. काही वेळानंतर त्याला शुद्ध आली.

यापूर्वी मार्च महिन्यात देखील भारतीय नौदलाने एका इराणी मच्छिमार जाहजावरील २३ सदस्यीय चालक दलाला मदत केली होती. या जहाजाचे सोमालियाच्या जवळ सशस्त्र समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. जहाज अल-कंबर ७८९ या जहाजाला २८ मार्च रोजी अरबी समुद्रात सोकोट्रा, यमनच्या दक्षिण-पश्चिमेला नऊ समुद्री चांच्यांनी ताब्यात घेतले होते. यानंतर आयएनएस सुमेधा आणि आयएनएस त्रिशूलने १२ तासांपेक्षा अधिक काळ ऑपरेशन राबवत समुद्री चाच्यांना सरेंडर करण्यास भाग पाडले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR