कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांच्या लूकची जोरदार चर्चा

मुंबई : प्रतिनिधी
जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक मानल्या जाणा-या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठी कलाकारांनी विशेष छाप पाडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस उपस्थितीची चर्चा रंगली असताना मराठी सिनेसृष्टीतील कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केलेली एन्ट्री सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सराफ दाम्पत्य हातात हात घालून रेड कार्पेटवर आले आणि उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. या दोघांनीही पारंपरिक मराठी पेहरावाला प्राधान्य दिल्याने त्यांचा लूक अधिक उठून दिसला. ग्लॅमर आणि फॅशनच्या झगमगाटातही आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहण्याचा संदेश त्यांनी दिल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

अशोक सराफ यांनी कान्ससाठी साधा पण आकर्षक असा पोशाख निवडला होता. पांढ-या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट अशा लूकमध्ये ते दिसले. तर निवेदिता सराफ यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक वैभवाची ओळख असलेली पैठणी साडी परिधान केली होती. त्यासोबतच त्यांनी दागिने, गजरा आणि पारंपरिक साजशृंगार करून आपला लूक पूर्ण केला होता. रेड कार्पेटवर त्यांचा हा मराठमोळा अंदाज पाहून उपस्थितांनाही विशेष आकर्षण वाटले. अनेकांनी त्यांच्या लूकचे कौतुक करत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

विशेष म्हणजे, रेड कार्पेटवर येताच अशोक सराफ यांनी हात जोडून उपस्थितांना नमस्कार केला. त्यांच्या या साधेपणाने आणि संस्कार जपणा-या कृतीने अनेकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्राच्या मातीतला माणूस जगाच्या कुठल्याही कोप-यात गेला तरी आपले संस्कार विसरत नाही, असे म्हटले आहे.

त्यांच्या या कृतीमुळे मराठी संस्कृतीचा सन्मान जागतिक व्यासपीठावर दिसल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाकारांची उपस्थिती विशेष ठरली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता पुष्कर जोग याने कान्समधील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता अशोक सराफ, निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर यांनीही या महोत्सवात सहभाग घेतला आहे. प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर यांनीही पारंपरिक मराठी पेहरावातून महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या कान्समध्ये ‘माय मराठी’चा ठसा उमटल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
00:00
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00
Video thumbnail
IAS Rahul Kulkarni|लातूर मनपाला अखेर नवे आयुक्त; राहुल कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार!
02:04
Video thumbnail
Solapur|दुधनी बाजार समितीत चबुतरा वाद पेटला; ५ तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची माघार
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अनधिकृत बॅनर्सविरोधात धडक मोहीम; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश
03:07
Video thumbnail
लोकनेते विलासराव देशमुख यांचा विकासाचा वारसा; लातूरला विभागीय आयुक्तालयाची गरज – आ. अभिमन्यू पवार
01:47
Video thumbnail
LIVE- विधान परिषद पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
02:24:19
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण
01:56:55
Video thumbnail
Nanded|"हिंमत असेल तर समोर या!" नागेश पाटील आष्टीकरांचा विरोधकांना इशारा
04:03
Video thumbnail
Latur|लातूर सिटी बसची पोलखोल! तपासणीत धक्कादायक त्रुटी
03:51
Video thumbnail
Latur|फिल्मी स्टाईल पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
02:19
Video thumbnail
Latur|जून संपला... पण पाऊस नाही! लातूरचा शेतकरी चिंतेत
05:24
Video thumbnail
HSRP NUMBER PLEAT|HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOची कारवाई सुरू
04:51
Video thumbnail
Breaking News|नांदेडमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे; राजकीय वातावरण तापले!
01:26

Latest news