33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
HomeFeaturedनागपूरमध्ये भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; दोन महिलांचा मृत्यू

नागपूरमध्ये भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; दोन महिलांचा मृत्यू

नागपूर : भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय किमान १० महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. कार्यक्रमात १२ हजार महिला कामगार उपस्थित होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या घटनेत आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या घटनेत मरण पावलेल्या महिलेचे नाव मनुबाई राजपूत (वय ६३) असे असून ती हातमजुरीचे काम करायची. कामगार महिलांना लाभ देण्याच्या उद्देशाने आठ मार्च ते ११ मार्चदरम्यान ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) पहाटे पाचपासून सभागृहात कामगार महिलांनी गर्दी केली होती. सभागृहात पाणी आणि पंख्याची व्यवस्था नसल्याने गुदमरायला लागल्याने महिलांनी बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी मुख्य द्वाराजवळ गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन चेंगराचेंगरीस सुरुवात झाली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महिलांच्या मृत्यूनंतर भाजपला धारेवर धरले आहे. सोशल मीडियात पोस्ट करत वडेट्टीवार म्हणाले की, भाजपच्या नागपूर येथील कार्यक्रमात चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला कोण जबाबदार? नागपूर शहरात कामगारांना किचनकिट वाटपाचा कार्यक्रम भाजपने आयोजित केला होता. या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींचा आकडा सुद्धा मोठा असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR