28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये मतदान केंद्रावर हल्ला; एसटीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगडमध्ये मतदान केंद्रावर हल्ला; एसटीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी नक्षलग्रस्त बस्तर विभागातील २० जागांवर आणि राजनांदगावसह इतर चार जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. त्याच वेळी, मिझोरामच्या सर्व ४० जागांवरही मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील मतदान केंद्रावर मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी हल्ला कल्याचे वृत्त आहे. सुकमा येथील कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदा परिसरात नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. तसेच ओरछा पोलीस ठाण्याजवळील जंगल परिसरात स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

नक्षलवादी मतदारांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळी सीआरपीएफ आणि डीआरजीच्या मोठ्या तुकड्या तैनात आहेत. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ओरछा पोलीस ठाण्याजवळील जंगल परिसरात स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान नक्षलवादी पळून गेल्याने एसटीएफचे जवान सुरक्षित आहेत. परिसरात शोध मोहीम सुरू आहे. नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रांना वेढा घातल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती चुकीची असून मतदान सुरू आहे. तसेच छत्तीसगडमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ४४.५५ टक्के मतदान झाले आहे.

१८ किंवा १९ जागा जिंकू
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, मतदानाची टक्केवारी चांगली आहे. कर्जमाफी, २०० युनिट मोफत वीज आदी मुद्द्यांवरून मतदानाची टक्केवारीही वाढेल आणि मतदारही उत्साहाने सहभागी होतील. आम्ही या टप्यात १८ किंवा १९ जागा जिंकू, एक जागा फसवणुकीने भाजपच्या वाट्याला जाऊ शकते, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR