32.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये निमलष्करी दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; काही जवान जखमी

छत्तीसगडमध्ये निमलष्करी दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; काही जवान जखमी

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा येथे निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेले निमलष्करी दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, या चकमकीत काही जवान जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ताडमेटला आणि डुलेड गावांदरम्यानच्या जंगलात ही चकमक झाली आणि सुमारे २० मिनिटे ही चकमक चालली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण बस्तरच्या दंतेवाडा जिल्ह्यातील मिनपा गावात सुरक्षेसाठी २०६ कोब्रा बटालियनचे जवान जंगल परिसरात तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुकमाच्या तोंडामार्का भागात माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेला सीआरपीएफ कोब्रा जवान जखमी झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR