रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर

मुंबई : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचा-यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर चार साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हात्रेस महाराष्ट्राबाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात जोपर्यंत पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जात नाही, तोपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहावे लागेल. ते राज्याबाहेर ज्या ठिकाणी वास्तव्य करतील, तिथल्या स्थानिक पोलिस ठाण्यात त्यांना आठवड्यातून ३ वेळा हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. खटला पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पीडित डॉक्टर किंवा साक्षीदाराशी संपर्क साधण्यास त्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे. ६ जुलै रोजी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका नवजात बाळाला एनआयसीयू बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना योग्य उपचारासाठी बाळाला दुस-या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. याचा राग मनात धरून नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलावून घेतले. रुग्णालयात पोहोचताच म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टरसह इतर वैद्यकीय कर्मचा-यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती, ज्यानंतर त्यांना ८ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

‘सुओ मोटो’ कारवाईनंतर आता जामीन
या प्रकरणी सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन दिला होता, मात्र या गंभीर घटनेची उच्च न्यायालयाने सुओ मोटो दखल घेत तो जामीन तात्काळ रद्द केला होता आणि त्यांना पुन्हा कोठडीत धाडले होते. आता या प्रकरणात न्यायालयाने अखेर त्यांना जामीन मंजूर केला असून त्यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्यांना थेट राज्याबाहेर राहावे लागणार असल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news