35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअवकाळीमुळे बळीराजा पुन्हा संकटात

अवकाळीमुळे बळीराजा पुन्हा संकटात

विदर्भात गारपिटीने पिके आडवी आज ‘येलो अलर्ट’

नागपूर : बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वा-यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. तर आज देखील विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वा-यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. १०) वादळी वा-यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला आहे.

तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. आज (ता. १२) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे
विदर्भातील वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजही विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्वण्यात आली आहे.

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत वरुणराजाने रविवारी उपराजधानीसह ग्रामीण भागांतही जोरदार हजेरी लावली. भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला, तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात आज (सोमवारी)ही पावसाचा इशारा असल्याने बळीराजाची चिंता व धाकधूक कायम आहे.

‘क्लोनिक सर्क्युलेशन’मुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. रविवारी (ता.११) नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घातला. यात रबी पिकांसह भाजीपाला, फळबागा व उन्हाळी धानाचे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे आंब्याचा मोहोर झडला असून शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
नागपूरलाही मध्यरात्रीच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. रात्री बारानंतर उत्तर नागपुरातील गोधनी, मानकापूरसह अनेक भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वा-यासह जवळपास अर्धा तास टपो-या थेंबांचा पाऊस पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR