35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरकर्कश्श आवाजाच्या डीजेला मनाई,शांतता कमिटी बैठक

कर्कश्श आवाजाच्या डीजेला मनाई,शांतता कमिटी बैठक

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या. दोन टॉप अन् दोन बेस लावूनच मिरवणुका काढा. डीजेला परवानगी नाही. आवाजाची मर्यादा ओलांडली गेल्यास आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी लागेल. याला आपण सूचना, विनंती, आदेश समजून घेऊन शांततेच्या मार्गाने शिवजयंती साजरी होण्यासाठी पोलिस सदैव आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केली, पोलिस आयुक्तालयामध्ये मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने मंगळवारी शांतता समिती सदस्य, सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

प्रस्तावनेत पोलिस उपआयुक्त डॉ. दीपाली काळे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. १९ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याच्या दोन तृतीयांश भाग सोडावा, उत्सवाचे पावित्र्य राखावे देखावे आक्षेपार्ह नसावेत, ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे अशा सूचना देण्यात आल्या.

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पुरुषोत्तम बरडे यांच्यासह अनंत जाधव, युवराज पवार, श्रीकांत डांगे, राजन जाधव, किरण पवार, शांतीकमार नागटिळक. किरण पवार आदी सदस्यांनी सूचना मांडल्या. संबंधित महानरपालिका, महावितरण, आरटीअप, धर्मादाय आयुक्त कार्यालयासह विविध खात्यांचे अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील, असे सांगितले.
या बैठकीस पोलिस आयुक्तांसह पोलिस उपायुक्त अजित बोर्‍हाडे. डॉ दीपाली काळे, विजय कबाडे, सहा. पोलिस उपायुक्त अशोक तोरडमल, अजय परमार, राजू मोरे, प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आरटीओ अर्चना गायकवाड, महावितरणचे आशिष मेहता पोलिस अधिकाऱ्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

७५ डेसिबल मयदिपेक्षा अधिक आवाज मिरवणुकीत वाढला तर मंडळाचे अध्यक्ष, डीजे चालक, वाहन चालकांवर कठोर कारवाई होऊ शकते. कर्णकर्कश आवाजानं शहरवासीयांना होणारा मनस्ताप आपण दूर केला पाहिजे. याची सुरुवात या उत्सवापासून सुरू करायला पाहिजे, अशी अपेक्षा पोलिस आयुक्तांनी केली. सकाळी पोलिस आयुक्तालयामध्ये डीजे चालक-मालकांसाठी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना ध्वनिमर्यादेसंबंधीच्या सूचना करण्यात आल्या. पायमल्ली झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याच्या सूचना करून ‘कायद्यात राहा फायद्यात राहा’ अशा सूचना देण्यात आल्या.जयंती उत्सवाच्या निमित्ताने जे फोटो लागले आहेत त्यांना बोलावून घेऊन हा खर्च कोठून केला याचा हिशोबही मागितला जाईल. महापुरुषांचा फोटो छोटा आणि इतरांचे मोठाले फोटो याबद्दल पोलिस आयुक्तांनी खंत व्यक्त केली. केवळ डीजेच्या तालावर नाचायचं नाही. शहराची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR