35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयबँक कर्मचारी १३ दिवस जाणार संपावर

बँक कर्मचारी १३ दिवस जाणार संपावर

नवी दिल्ली : बँक कर्मचारी ४ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत तब्बल १३ दिवस संपावर जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार विविध तारखांना हा संप करण्यात येणार आहे. या काळात देशातील विविध बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

४ डिसेंबर रोजी पीएनबी, एसबीआय आणि पंजाब अँड सिंध बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. ५ डिसेंबर रोजी, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियातील कर्मचारी, ६ डिसेंबर रोजी कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ७ डिसेंबर रोजी इंडियन बँक आणि युको बँक, ८ डिसेंबर रोजी युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि ११ डिसेंबर रोजी खासगी बँकेतील कर्मचारी संपावर जाणार आहेत.

२ जानेवारी रोजी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. ३ जानेवारी रोजी गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. ४ जानेवारी रोजी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. ५ जानेवारी रोजी दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील सर्व बँकांमधील कर्मचाऱ्यांचा संप असेल.

तर ६ जानेवारी रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील सर्व बँकांचा संप असेल आणि १९ आणि २० जानेवारी या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या
बँक कर्मचाऱ्यांनी तीन मागण्या केल्या आहेत. यातील पहिली मागणी आहे की, सर्व बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे बँकांमधील कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे आणि तिसरी मागणी आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR