भोकर : उसतोडणीच्या कामासाठी जाणा-या बापलेकाच्या मोटारसायकलचा टाटा २०७ ला धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना ३० नोव्हेंबर च्या रात्री ७ घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार व्हॅन क्रमांक टीएस ०९ यूडी ४०४६ ही भोकरहून हिमायतनगर येथे जात असताना दुचाकी क्रमांक एमएच २६ सीसी १३३० सुधा प्रकल्पाजवळ समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील शंकर अप्पा राठोड (५०) आणि लखन शंकर राठोड २८, या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृतदेह भोकर येथील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.