29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रआरक्षणप्रश्नी भुजबळांची जी भूमिका, तीच सरकारची

आरक्षणप्रश्नी भुजबळांची जी भूमिका, तीच सरकारची

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भुजबळांना पाठिंबा

ठाणे : ओबीसी समाजाचा मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज आणि इतर समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे; परंतु ओबीसी कोट्यातून देऊ नये, अशी मागणी करीत छगन भुजबळ मला भेटले.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही ही सरकारची भूमिका पहिल्यापासून आहे. जी भूमिका भुजबळांची आहे, तीच सरकारची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी काम देखील सुरू आहे. कुणबी म्हणून नोंदी असताना दाखले दिले जात नव्हते, ते देण्याचे काम सुरू आहे. भुजबळ यांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होता कामा नये आणि हीच भूमिका सरकारचीही आहे आणि ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. जुन्या जीआरची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे काम हे सरकार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR