नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरण: सीबीआयचा पुणे आणि लातूरमध्ये एकाच वेळी दणका; बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे ताब्यात, पुण्यात संशयित विद्यार्थ्यांवर धाडी

पुणे/लातूर: देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता तीव्र गती आली असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्र आणि इतर रांज्यांमध्ये आपला फास अधिक आवळला आहे. बुधवारी सीबीआयच्या पथकांनी पुणे आणि लातूरमध्ये एकाच वेळी मोठे कारवाई सत्र राबवले. यामध्ये लातूरमधून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून, पुण्यात संशयित विद्यार्थ्यांच्या घरांवर धाडी टाकून डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

नीट पेपरफुटीच्या लातूर कनेक्शनमध्ये आता एका मोठ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि डॉ. शिरूरे यांचे थेट कनेक्शन समोर आले आहे. या संदर्भावरून सीबीआयचे पथक मंगळवारपासूनच डॉ. शिरूरे याची कसून चौकशी करत होते. डॉ. शिरूरे यांनी हा पेपर नेमका कोणाकडून मिळवला होता आणि तो पुढे इतर कोणत्या विद्यार्थी किंवा पालकांना विकण्यात आला का, याचा तपास आता सीबीआय करत आहे. प्राथमिक चौकशीनंतर डॉ. शिरूरे यांना पुढील तपासासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी दिल्लीला नेण्यात येणार असल्याचे समजते.

दुसरीकडे, पुण्यात संशयित विद्यार्थ्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. पुण्यातील विविध भागांमध्ये सीबीआयच्या पथकांनी बुधवारी एकाच वेळी धाडी टाकल्या. काही संशयित विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि अत्यंत संशयास्पद माहिती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान संशयित विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन, संगणक (Laptops) आणि इतर डिजिटल गॅजेट्स सीबीआयने जप्त केले आहेत. जप्त केलेल्या उपकरणांची न्यायवैद्यक तपासणी तातडीने सुरू करण्यात आली असून, डिलीट केलेला डेटा रिकव्हर करून आणखी मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. संशयित विद्यार्थ्यांचे आई-वडील, त्यांचे मित्र, हॉस्टेलमध्ये एकत्र राहणारे विद्यार्थी आणि त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचीही सीबीआय चौकशी करत आहे. कारवाईची कुणकुण लागताच पुण्यातील काही संशयितांनी शहर सोडल्याची माहिती समोर आली असून, फरार झालेल्या संशयितांच्या मित्रांवर आणि जवळच्या संपर्कांवर सीबीआय सध्या कडक पाळत ठेवून आहे. दरम्यान, चौकशी झालेल्या सर्व व्यक्तींना तपासातील कोणतीही माहिती बाहेर सांगू नये, असा सक्त इशारा देण्यात आला आहे. लातूरमध्ये आणखी एका कारवाईत, मोबाईलवर नीटचा पेपर मिळाल्याच्या संशयावरून सीबीआयच्या पथकाने बुधवारी जळगावच्या एका विद्यार्थ्याची चौकशी केली. हा विद्यार्थी लातूरमध्ये कुठे आहे, याचा सीबीआयने तब्बल दोन तास शोध घेतला आणि अखेर त्याला गाठून त्याची कसून चौकशी केली.

नीट पेपरफुटी प्रकरणात आधीच अटकेत असलेला ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पेपरफुटीच्या कारवाईसोबतच आता पुणे महानगरपालिकेनेही मोटेगावकरच्या संस्थांवर कायदेशीर बडगा उगारला आहे. मोटेगावकर यांच्या पुण्यातील संस्थांनी तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला होता. या थकबाकीप्रकरणी महापालिकेने संबंधित जागा तत्परतेने सील केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, तिथल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने थेट हातोडा चालवला आहे. मोटेगावकर यांच्याशी संबंधित इतरही मालमत्तांची चौकशी महापालिकेने सुरू केली आहे.

या प्रकरणाच्या कोर्ट अपडेट्सनुसार, दिल्लीतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील अन्य आरोपींबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. पेपरफुटीतील प्रमुख आरोपी शुभम खैरनार याच्या सीबीआय कोठडीत न्यायालयाने आणखी ५ दिवसांची वाढ केली आहे. तर जयपूरचे मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल, गुरुग्रामचा यश यादव आणि अहिल्यानगरचा (अहमदनगर) धनंजय लोखंडे या पाच आरोपींची सीबीआय कोठडी संपल्याने त्यांना २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. लातूरच्या बालरोगतज्ज्ञाची अटक आणि पुण्यात विद्यार्थ्यांवर पडलेल्या धाडींमुळे नीट पेपरफुटीचे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट होत असून आगामी काळात महाराष्ट्रातून अनेक बडे मासे सीबीआयच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news