‘कॉकरोच जनता पार्टी’ची देशभरात हवा! जाहीरनामा वाचून थक्क व्हाल, मराठी तरुणाने अमेरिकेतून सुरू केली डिजिटल चळवळ

सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच ‘राजकीय पक्षाची’ जोरदार चर्चा रंगली आहे. नाव ऐकून सुरुवातीला अनेकांना हा काहीतरी विनोद किंवा ‘मीम’ वाटला, पण अवघ्या काही दिवसांतच या ‘कॉकरोच जनता पार्टीने’ (Cockroach Janta Party – CJP) इंटरनेटवर मोठी क्रांती घडवून आणली आहे. फक्त २ ते ३ दिवसांत ४० हजारांपेक्षा जास्त सदस्यांनी या पार्टीची अधिकृत नोंदणी केली असून, इन्स्टाग्रामवर या डिजिटल चळवळीच्या फॉलोअर्सचा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यासह अनेक दिग्गजांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे.

पण ही पार्टी नक्की काय आहे? ती कुणी आणि का सुरू केली? आणि तिचा जाहीरनामा काय आहे? जाणून घेऊया सविस्तर…

‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात कशी झाली?
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान झाली. एका प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कथितपणे बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ (Cockroaches) केली होती. काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात, ते यंत्रणांमध्ये घुसखोरी करत आहेत, अशी टिप्पणी आल्याची मीडिया रिपोर्ट्स समोर आली. या विधानानंतर देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. न्यायाधीशांनी नंतर स्पष्टीकरण दिले की हे विधान सामान्य तरुणांसाठी नसून बनावट पदव्या घेणाऱ्यांसाठी होते, परंतु तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला होता. याच अपमानाचा निषेध करण्यासाठी तरुणांनी या उपहासात्मक डिजिटल चळवळीची स्थापना केली.

कुणी केली या पक्षाची स्थापना? (महाराष्ट्र कनेक्शन)
या अनोख्या डिजिटल बंडखोरीचे नेतृत्व एका मराठी तरुणाच्या हाती आहे. अभिजीत दीपके असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगरचा (महाराष्ट्र) रहिवासी आहे. अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचे उच्च शिक्षण घेत आहे. त्याने बोस्टनमध्ये बसूनच ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने वेबसाईट, इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) खाते सुरू केले, ज्याला देशातील लाखो बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांनी डोक्यावर घेतले आहे. पक्षाचा नाराही ‘सेक्युलर, सोशालिस्ट, डेमॉक्रेटिक आणि लेझी’ असा गमतीशीर ठेवण्यात आला आहे.

जाहीरनामा वाचून थक्क व्हाल!
जरी ही चळवळ उपहासात्मक आणि विनोदी शैलीत सुरू झाली असली, तरी पक्षाने देशातील गंभीर मुद्दोंना हात घालत ५-कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात कोणताही सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा जागा किंवा इतर कोणतेही सरकारी पद दिले जाणार नाही, असा पहिला नियम मांडण्यात आला आहे. याशिवाय न्यूज चॅनेल्सनी कोणत्याही वक्तव्याची तोडफोड करून किंवा संदर्भ बदलून बातमी दाखवली, तर त्यांचे परवाने रद्द केले जातील. एखादा आमदार किंवा खासदार निवडून आल्यानंतर जर त्याने पक्ष बदलला, तर त्याला पुढील निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल. प्रत्येक क्षेत्रात आणि राजकीय पातळीवर महिलांना समान प्रतिनिधित्व दिले जाईल आणि व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक ठेवून आरटीआय कायद्याला अधिक बळकट केले जाईल, अशा महत्वाच्या मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

पक्षाचे चिन्ह आणि सदस्यत्वाची पात्रता
या डिजिटल पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘झुरळ’ (Cockroach) आहे. अभिजीत दीपके यांच्या मते, या पार्टीत सामील होण्यासाठी तरुण बेरोजगार किंवा व्यवस्थेने नाकारलेला असावा. पदव्या असूनही योग्य नोकरी न मिळालेला आणि व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणांवर उपहासात्मक पद्धतीने आवाज उठवण्याची तयारी असलेला कोणताही तरुण यात सहभागी होऊ शकतो. सुरुवातीला केवळ ४० हजारांवर असणारा हा आकडा आता लाखोंच्या पार गेला असून, भाजप-काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांना सोशल मीडिया फॉलोअर्सच्या शर्यतीत ही ‘झुरळ यंत्रणा’ टक्कर देत आहे. एका विधानाचा निषेध करण्यासाठी तरुणांनी उभी केलेली ही डिजिटल चळवळ आता देशातील एक मोठी ऑनलाईन बंडखोरी ठरत आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news