भीषण आगीत सायकल स्पेअरपार्ट दुकान जळून खाक

पूर्णा : शहरातील गजबजलेल्या टिळक रोडवरील बसवेश्वर सायकल स्पेअरपार्टच्या दुकानाला काल रविवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील टायर, ट्यूब व हवा भरण्याच्या मशीनसह आदी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत दुकान मालक स्वामी यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहरात रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन असल्यामुळे दुकानात पूजा करताना लावलेल्या दिवातील वातीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत दुकानातील मोटारसायकलचे टायर व रबरी ट्यूब असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. टायरमुळे आगीचा भडका उडाल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते.

या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांकडून आग विझविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन पथकातील कर्मचारी गणेश रापतवार, तन्वीर कुरेशी, दीपक गवळी आणि अमजद कुरेशी यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीची झळ शेजारील दुकानांना पोहोचली नाही. ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पूर्णा पोलिसांनीही त्वरित घटनास्थळ गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, बीट जमादार चाऊस, जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगरसेवक राजू भालेराव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली व गर्दीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठी आपत्ती टळली. या दुर्घटनेमुळे व्यावसायिक स्वामी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59

Latest news