घरपट्टी थकीत असतानाही भाजप उमेदवाराचा अर्ज मंजूर

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार रंजिता चाकोते यांची घरपट्टी थकीत असतानाही त्यांचा अर्ज मंजूर केल्याच्या आरोप काँग्रेसच्या उमेदवार रमाबाई पांडागळे यांनी केला आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननी बुधवारी ३१ डिसेंबर रोजी पूर्ण झाली. तपासणी दरम्यान प्रभाग क्रमांक तीन क मधून भाजपने रंजिता चाकोते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या अर्जावर काँग्रेसच्या उमेदवार रमाबाई पांडागळे यांनी हरकत घेतली आहे. पांडागळे यांच्या म्हणण्यानुसार भाजप उमेदवार रंजीता चाकोते यांनी उमेदवारी अर्जावर जो पत्ता लिहिला आहे.

त्या घराची महापालिकेकडे खूप मोठी थकबाकी आहे. थकबाकी असल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी रमाबाई पांडागळे यांनी केली होती. हरकतीवर सुनावणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित घराचे मालक व रंजीता चाकोते यांचे नाते असल्याचे सिद्ध करणारा कागद काँग्रेसच्या उमेदवाराने न दिल्यामुळे रंजीता चाकोते यांच्या घराची थकबाकी असल्याचे म्हणता येत नाही, असे म्हणत अर्ज नामांजूर केला आहे, अशी माहिती रमाबाई पांडागळे यांनी दिली.

दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांनी वकिल्यांबरोबर त्यांना आत सोडावे अशी मागणी धरली होती. मात्र पोलिसांनी त्यांना त्यासाठी अडवल्याचे सांगितले आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45

Latest news