24.6 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरमध्ये भाजप पदाधिका-याची हत्या

नागपुरमध्ये भाजप पदाधिका-याची हत्या

नागपूर: राज्यात हत्यांचे सत्र सुरूच आहे. नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिका-याची मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिका-यांचे नाव आहे.

राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगव परिसरात आढळून आला. मध्यरात्री तीन वाजता ही घटनाा घडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.

मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR