37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रकेजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल

केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल

मुंबई : अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई केली मात्र, त्याचा फायदा केजरीवालांच्या पक्षाला होईल, त्याच्या सर्व जागा निवडून येतील, दिल्लीची जनता केजरीवालांच्या बाजूने उभी राहिल असेही शरद पवारांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ईडी, सीबीआयचा वापर करणे निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे, असेही ते पुढे म्हणालेत.

केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल असेही शरद पवार यांनी म्हटले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा मोठा विस्तार केला. केवळ दिल्ली, पंजाब नाही, तर देशभरात पक्ष मोठा होत आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली. याचीच भाजपाला भीती आहे. आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. अरंिवद केजरीवाल यांची अटक राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भाजपा आणि केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले. इंडिया आघाडीसह विरोधकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा कडक शब्दांतून निषेध नोंदवला. मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

त्यांना उठाव होण्याची भीती : राऊत
हा घोटाळा फक्त कागदावरच आहे. तरीही त्यांना अटक करण्यात आली. हुकुमशाहीप्रमाणे अशी कारवाई होत आहे. एकेकाळी नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होते. अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ज्यांच्यापासून भीती आहे, त्यांना अटक करण्यात येत आहे. त्यांना निवडणूक हरण्याची, उठाव होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व नेते तुरुंगात टाकत आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR