अमेरिका आणि रशियात बॉम्बर विमान कोसळले

न्यूयॉर्क/मॉस्को : दक्षिण कॅलिफोर्नियातील मोहावे वाळवंटातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवर सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. उड्डाण घेताच अमेरिकन हवाई दलाचे बी-५२ स्ट्रॅटोफोर्ट्रेस बॉम्बर विमान कोसळले. खाली कोसळताच विमानाला आग लागली. यात विमानातील सर्व आठही कर्मचा-यांचा होरपळून मृत्यू झाला. आठ इंजिन असलेले हे विमान एका नियमित चाचणी मोहिमेवर होते.

उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते एडवर्ड्स येथील धावपट्टीवर कोसळले, अशी माहिती हवाई दलाचे कर्नल जेम्स हेस यांनी दिली. मृतांमध्ये लष्करी अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि सरकारी कंत्राटदार यांचा समावेश आहे. हे उड्डाण रडार आधुनिकीकरण कार्यक्रमाला सहाय्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते, असे हेस यांनी पत्रकारांना सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत तपास सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणार्थी उड्डाणादरम्यान रशियन बॉम्बर विमान कोसळले
प्रशिक्षणार्थी उड्डाणादरम्यान रशियन हवाई दलाचे टीयू-२२ए३ हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान सायबेरियातील इर्कुत्स्क प्रदेशात कोसळले. सुदैवाने विमानातील चारही वैमानिकांनी वेळेत घेतल्याने ते बचावले असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. कामेन्का गावाजवळ हे विमान कोसळल्याचे इर्कुत्स्कचे गव्हर्नर इगोर कोब्झेव्ह यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. इंजिन निकामी झाल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज कोब्झेव्ह यांनी व्यक्त केला. नाटोमध्ये बॅकफायर नावाने ओळखल्या जाणा-या टीयू-२२ हे सोव्हिएत काळातील सुपरसॉनिक बॉम्बर विमान आहे. रशियाने सीरिया आणि युक्रेनमधील लढायांमध्ये याचा वापर केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news