24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप निश्चित

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप निश्चित

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्याा राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ब्रिजभूषण सचिव विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

ब्रिज भूषण यांच्यावर कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणेकिंवा गुन्हेगारी बळजबरी करणे), ३५४-अ (लैंगिक छळ) आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. विनोद तोमर यांच्यावर कलम ५०६(१) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह विरुद्ध कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे), ३५४-अ (लैंगिक छळ), ३५४- आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR