30.6 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeसोलापूरबुलेट, थारच्या लागल्या पैजा

बुलेट, थारच्या लागल्या पैजा

माढ्यात विडा कोण उचलणार?

सोलापूर : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत. सर्व उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र निकाल लागण्याआधीच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे. सध्या एका बुलेटराजाच्या पैजेच्या आव्हानाने माढा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.

माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील की भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यापैकी कोण विजयी होणार? याबाबतच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आता माढा तालुक्यातील बावी येथे असणारे निलेश पाटील आणि माऊली सावंत यांनी चक्क नव्याको-या ११ बुलेट्सची पैज लावली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी ही पैज लावण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

विशेष म्हणजे ही पैज सध्या एकाही भाजप कार्यकर्त्याने स्वीकारलेली नाही. एकीकडे बुलेटची पैज असताना, दुसरीकडे अकलूजच्या सहकारमहर्षी कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर यांनी थार गाडीची पैज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी लावली असल्याची माहिती सोशल मीडियात आहे. त्यांच्याही पैजेला अद्याप कुणी प्रतिसाद दिलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR