24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रगोंदियातील जळीत कांड, आरोपीला फाशीची शिक्षा

गोंदियातील जळीत कांड, आरोपीला फाशीची शिक्षा

गोंदिया : प्रतिनिधी
गोंदियाच्या सूर्यटोला जळीत कांडातील आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने यासंबंधी महत्त्वाचा निकाल दिला. आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळले होते. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, कॉन्फरमेशन करिता हायकोर्टात जाणार असून तिथून ही सजा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्यातील सूर्याटोला येथे माहेरी आलेल्या पत्नी, ५ वर्षीय मुलगा आणि सास-याला तिरोडा येथील आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री येऊन जिवंत जाळले. ही घटना १४ फेब्रुवारी २०२३ ला घडली होती. या घटनेत सास-याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलाने आरडाओरडा केल्याने शेजा-यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ते ९० टक्के भाजले होते. महिला, पाच वर्षीय मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते. अखेर या प्रकरणी आज ९ मे २०२४ ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR