38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयसावधान...वापरात नसलेले ‘यूपीआय’ बंद होणार

सावधान…वापरात नसलेले ‘यूपीआय’ बंद होणार

‘एनपीसीआय’कडून नवी नियमावली जारी थर्ड पार्टी यूपीआय अ‍ॅप्सना सूचना

नवी दिल्ली : तुम्ही देखील यूपीआय पेमेंट पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय)ने यूपीआय युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सरकारने म्हटले आहे की, युजर्सच्या निष्काळजीमुळे तुमचे यूपीआय खाते आणि यूपीआय आयडी बंद होऊ शकतो. यूपीआय नेटवर्क चालविणा-या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने, गुगल पे, पेटीएम आणि फोन पे सारख्या थर्ड पार्टी यूपीआय ऍप्सना काही यूपीआय आयडी आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितले आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने जारी केलेल्या नोटिसमध्ये सांगितले आहे की, वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत. एनपीसीआयने यूपीआय नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वापरात असलेला यूपीआय क्रमांक आणि यूपीआय आयडी सक्रिय राहतील.

एनपीसीआयने सांगितले आहे की, डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहाराचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी बँकिंग प्रणाली नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. काही युजर्स नव्याने अकाऊंट लिंक करुन मोबाइल नंबरला बदलतो पण त्या नंबरवरून यूपीआई खाते बंद करत नाही.

३१ डिसेंबरपर्यंत मुदत
एनपीसीआयने निष्क्रिय यूपीआय क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी ऍप्सना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे, जर युजर्सला त्याचा यूपीआय आयडी आणि नंबर नेटवर्क बंद करायचे नसेल, तर त्याला त्याचा यूपीआय सक्रिय ठेवावा लागेल. यूपीआय आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना, बँका आणि थर्ड पार्टी ऍप्सना ईमेल आणि मेसेजद्वारे युजर्सना माहिती द्यावी लागेल.

११ अब्ज यूपीआय व्यवहार
एनपीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत यूपीआयच्या माध्यमातून ११ अब्जहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत यूपीआय व्यवहार जवळपास एक अब्जने वाढले आहेत. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक त्यांचे मोबाईल नंबर बदलतात. त्यावेळी, सिस्टममधून जुना क्रमांक काढला जात नाही. ट्रायच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन युजरला जुना क्रमांक जारी केला जाऊ शकतो. यामुळे, सर्व बँका आणि थर्ड पार्टी ऍप्सना कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जात नाहीत, असे सर्व निष्क्रिय यूपीआय आयडी आणि नंबर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR