35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeउद्योगआता कार्ड ऐवजी अंगठीद्वारे पेमेंट करा

आता कार्ड ऐवजी अंगठीद्वारे पेमेंट करा

नवी दिल्ली : खिशात रोख रक्कम नसली तरी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे झटपट पेमेंट करण्याचा पर्याय लोकप्रिय झालेला आहे. आता एक खास प्रकारची रिंगही विकसित झाली आहे. तिच्या माध्यमातून तुम्ही कुठलेही पेमेंट करू शकता. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या पाहिल्या असतील. मात्र कुठलीही बॅटरी नसलेली स्मार्ट रिंग तुम्ही क्वचितच पाहिली असेल. एका स्टार्टअपने काँन्टॅक्टलेस पेमेंटवाली रिंग लाँच केली आहे. या रिंगचे नाव ७ रिंग असे आहे. ही रिंग कंपनीने सप्टेंबर महिन्यात फिनटेक एफई २३ २०२३ मध्ये शोकेस केले होते.

ही खास प्रकारची अंगठी भारतीय ब्रँड ७ ने एनपीसीआयसोबत मिळून डेव्हलप केली आहे. हे डिव्हाईस एनएफसीवर काम करते. या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही पाहिला असेल. अनेक दुकानांवर तुम्ही टॅप अँड पे मेथडचा वापर केला असेलच. हे फिचर अनेक क्रेडिट कार्ड्स, सॅमसंग पे, अ‍ॅपल पेसोबत मिळतं. आता ही रिंग विकसित करणा-या कंपनीने सांगितले की, ही ंिरगसुद्धा त्याच तंत्रज्ञानावर काम करते. मात्र या ंिरगचे सिक्युरिटी फिचर अधिक चांगले आहे.

किंमत ७ हजार
कंपनीने ही ंिरग भारतामध्ये ७ हजार रुपये किमतीवर लाँच केली आहे. मात्र अर्ली बर्ड ऑफरअंतर्गत कंपनी ही रिंग ४,७७७ रुपयांना विकत आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. युझर्स हे डिव्हाईस ईएमआयवरही खरेदी करू शकतात. ७ रिंग ८२९ रुपयांच्या सहा महिन्यांच्या ईएमआयवर खरेदी करता येऊ शकता.

सर्वांना उपलब्ध नाही
या किमतीवर खरेदी केलेल्या ंिरगसाठी कंपनी ५५ महिन्यांची व्हॅलिडिटी आणि १ वर्षाची वॉरंटी देत आहे. मात्र ही रिंग सध्या सर्व युझर्सना उपलब्ध नाही आहे. सध्या इन्व्हाइट कोड मिळालेल्या युझर्सनाच ही रिंग खरेदी करता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR