23.4 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगर जिल्ह्यात ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद

छ. संभाजीनगर जिल्ह्यात ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर वगळता जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव आदी ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला आता काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर वगळता गंगापूर, वैजापूर, खुलदाबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव आदी तालुक्यातील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. फक्त संभाजीनगर शहरात इंटरनेट सेवा सुरु राहणार असून मात्र कुठे काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR