केंद्राच्या वंदे मातरम भूमिकेला मुख्यमंत्री विजय यांचा विरोध

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेत एकमताने एक ठराव मंजूर करण्यात आला असून त्यानुसार शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला सर्वप्रथम तमिळ थाई वाझथु हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयाकडे, कार्यक्रमांच्या सुरुवातीला वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सर्वप्रथम वाजवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशाना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी दिलेले आव्हान म्हणून पाहिले जात आहे.

हा ठराव मांडताना मुख्यमंत्री विजय म्हणाले की, राज्यामध्ये तमिळ गीतालाच सर्वोच्च प्राधान्य मिळालं पाहिजे. द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही पक्षांनी या ठरावाला पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांनी हा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली आणि याच्या अंमलबजावणीसाठी आता इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. आज विधानसभेतील एका भावनिक भाषणात विजय यांनी स्पष्ट केले की, त्यांचे सरकार राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक हक्कांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. तमिळ ही केवळ एक भाषा नसून ती आमची जीवनवाहिनी आणि भावना आहे असे सांगत त्यांनी मातृभाषा ही मातृत्वाइतकीच पवित्र असल्याचे अधोरेखित केले.

तमिळ थाई वाझथु लाच पहिले स्थान मिळाले पाहिजे
ते पुढे म्हणाले तमिळ म्हणजे अभिमान, तमिळ म्हणजे ताकद. तुम्ही तमिळ शब्द उच्चारताच संपूर्ण तमिळनाडू एकत्र येतो आणि एकसंध उभा राहतो. तमिळनाडूमध्ये तमिळ थाई वाझथु लाच पहिले स्थान मिळाले पाहिजे. तमिळ थाई वाझथु ला पहिले स्थान देणे हा आमचा अधिकार आहे. या ठरावानुसार तमिळनाडूतील शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे राज्यगीत सर्वप्रथम गाणे अनिवार्य आहे.

काय आहेत केंद्राचे आदेश?
केंद्रीय गृह मंत्रालयाने जानेवारी महिन्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये आधी राष्ट्रीय गीत आणि नंतर राष्ट्रगीत वाजवण्याचे निर्देश जारी केले होते. त्यानंतर जुलैमध्ये काढलेल्या एका सूचनेत सरकारने राज्यांना या निर्देशांचे कडक पालन करण्यास सांगितले होते. ९ जुलैच्या सूचनेत म्हटले होते की जेव्हा जेव्हा राष्ट्रीय गीत/राष्ट्रगीतासोबत राज्यगीत गायले किंवा वाजवलं जाईल, तेव्हा राष्ट्रीय गीत प्रथम गायले किंवा वाजवले जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत वाजवले जाईल.

तामिळनाडूमध्ये तमिळ थाई वाझथु हे गीत अनिवार्य
तामिळनाडूमध्ये १९७० मध्ये शासकीय कार्यक्रमांमध्ये तमिळ थाई वाझथु हे गीत अनिवार्य करण्यात आलं होतं. तेव्हापासून अधिकृत कार्यक्रमांमध्ये ते सर्वात आधी वाजवण्याची परंपरा बनली होती. पुढे २०२१ मध्ये या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. मे महिन्यात एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीतानंतर हे तमिळ गीत तिस-या क्रमांकावर वाजवलं गेल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी, जेव्हा विजय यांच्या पक्षाच्या २३ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हाही हे गीत पुन्हा तिस-या क्रमांकावर ढकलले गेले. राज्यपाल कार्यालयाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा टीव्हीके पक्षाने केला होता. नुकतेच तमिळनाडूतील २१ खासदारांनी राज्यपालांना पत्र लिहून अशा कार्यक्रमांच्या सुरुवातीला राज्यगीत प्रथम आणि शेवटी राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याची विनंती केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
04:28
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये सोयाबीन पिकावर संकट!दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांची मागणी
01:53
Video thumbnail
Latur|जगायला बळ द्या, अन्यथा मारून टाका!” शिरूर अनंतपाळमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश
03:37
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
09:37
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36

Latest news