६ खासदारांच्या विलिनिकरणाबाबतची सुनावणी लांबली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर उद्धवसेनेतील सहा खासदारांचा एक गट फुटून शिंदेसेनेत विलीन झाला होता. तसेच या सहा खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनीही मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाविरोधात उद्धवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. उद्धवसेनेच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली असून आजच्या सुनावणीवेळी लोकसभा अध्यक्ष आणि इतर खासदारांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ वाढवून मागितल्याने आता ही सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.

उद्धवसेनेच्या सहा खासदारांचे शिंदेसेनेतील विलिनीकरण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी लोकसभा अध्यक्ष आणि काही खासदारांनी आपली बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितली. या प्रकरणी झालेल्या आधीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा अध्यक्ष आणि संबंधित सहा खासदारांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटिस बजावली होती. मात्र लोकसभा अध्यक्षांनी आपले म्हणणे अद्याप सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले नाही. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितल्यानंतर न्यायमूर्तींनी या प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news