एआयद्वारे प्रयोगशाळेत व्हायरस तयार

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आता माणसांना संक्रमित करू शकणारा जटिल व्हायरस तयार करता येऊ शकतो, असा प्रयोग समोर आला आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी एआयचा वापर करून प्रयोगशाळेत पूर्णपणे काम करणारे कृत्रिम व्हायरस तयार केले. या प्रयोगाने गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नवी शक्यता निर्माण झाली असली, तरी जैवसुरक्षेचा धोका देखील वाढला आहे.

या प्रयोगामुळे एका बाजूला संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी नवी दारे उघडली आहेत. मात्र, दुस-या बाजूला जैवसुरक्षेचा प्रश्नही तितकाच गंभीर झाला आहे.
तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर झाल्यास माणसांना नुकसान पोहोचवणारे नवे सुपर-व्हायरस तयार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एआय व जैव तंत्रज्ञानाच्या संगमावर कठोर सुरक्षा नियमांची गरज अधोरेखित झाली आहे.

कृत्रिम व्हायरसची निर्मिती
वैज्ञानिकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्वत:हून काम करू शकणारे कृत्रिम व्हायरस तयार करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगात जनुकीय संकेतांच्या आधारे संभाव्य जीनोम तयार करण्यात आले. संशोधकांनी बॅक्टेरियोफेज नावाच्या अशा व्हायरसवर काम केले, जे जीवाणूंना संक्रमित करतात. प्रयोगासाठी सुमारे २० लाख बॅक्टेरियोफेजच्या जनुकीय संकेतांवर एआय वापरण्यात आले. त्यातून हजारो जीनोम तयार केले. त्यातील १६ व्हायरस जिवंत राहिले.

माणसाला संसर्ग करणारा ‘व्हायरस’ बनवणे शक्य?
माणसांना संक्रमित करणारा जटिल व्हायरस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार करणे अद्याप सोपे नाही. मात्र, या प्रयोगाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात सुपरबग्जविरोधात प्रभावी उपचार विकसित करण्याची शक्यता आहे. विशेषत: औषधांना दाद न देणा-या जीवाणूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी बॅक्टेरियोफेजचा वापर महत्त्वाचा ठरू शकतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news