38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्­ये महिलांना प्रतिवर्ष १५ हजार रुपये

छत्तीसगडमध्­ये महिलांना प्रतिवर्ष १५ हजार रुपये

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. या रणधुमाळीत आज काँग्रेसने राज्­यातील महिलांना मोठे आश्­वासन दिले. पुन्­हा सत्तेत आल्­यास राज्­यातील महिलांना वार्षिक १५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्­वासन मुख्­यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले.

विवाहित महिलांना प्रतिवर्षी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्­वाही भाजपने आपल्­यान निवडणूक जाहीरनाम्यात दिली आहे. आता काँग्रेस प्रतिवर्षी १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत माध्­यमांशी बोलताना मुख्­यमंत्री भूपेश घेल यांनी सांगितले की, आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर, राज्यातील महिलांना छत्तीसगड गृह लक्ष्मी योजनेअंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात १५ हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाईल. छत्तीसगडमध्­ये विधानसभेच्­या ९० जागांपैकी २० जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला पार पडले. उर्वरित ७० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR