28.5 C
Latur
Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रमला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही

 जरांगेंचा सरकारला इशारा

जालना : सरकारशी कोणताही संवाद झाला नसून, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाहीत. त्यांच्याकडून कसे उत्तर घ्यायचे यासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे.

त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे तानाजी सावंत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाहीत. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे म्हणाले आहेत.

मीडियाच्या कॅमे-यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, ‘‘त्यांच्या कानात बोळे घातले आहेत का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत, असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायला पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाहीत. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR