31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeराष्ट्रीयजेएनयूत अभाविप-डाव्या संघटनांमध्ये संघर्ष

जेएनयूत अभाविप-डाव्या संघटनांमध्ये संघर्ष

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्यांचे समर्थन लाभलेल्या गटांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटली. आगामी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित सर्वसाधारण सभेत दोन्ही गटांमध्ये हाणामारी होऊन काही विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही गटांनी या घटनेचे खापर एकमेकांवर फोडले असून जेएनयू प्रशासनाने याबाबत कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही.

जेएनयू विद्यार्थी संघटनेची निवडणूक या वर्षी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी जेएनयू संकुलातील साबरमती ढाबा येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विद्यापीठाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे अभाविपच्या सदस्यांनी व्यासपीठावर अतिक्रमण करत समितीच्या सदस्यांना आणि वक्त्यांना धक्काबुक्की करून सर्वसाधारण सभेला अडथळा आणल्याचा आरोप डाव्यांशी संलग्न डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशनने (डीएसएफ) केला आहे.

अभाविपच्या विद्यार्थ्यांनी धक्काबुक्कीदरम्यान जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष हिच्यावर हल्ला करून तिच्यावर पाणी फेकल्याचा दावा ‘द स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ने केला. या घटनेची खात्री करण्यासाठी आईशाला संपर्क साधला असता, तिने प्रतिसाद दिला नाही. तर, जेएनयूमध्ये अभाविपचा सचिव असणा-या विकास पटेल याच्यावर डीएसएफच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप उजव्या गटाने केला. प्रफुल्ल या विद्यार्थ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले, अभाविपला समर्थन देणा-या दिव्यांग विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा दावाही अभाविपच्या वतीने करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR