31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeराष्ट्रीयकर्नाटकमध्ये काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या

कर्नाटकमध्ये काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या

झोपेत असताना ४ हल्लेखोरांचा हल्ला

धारवाड : कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. धारवाड शहरातील एका काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव फिरोज पठाण असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या हत्येचा पुढील तपास करत आहेत, तसेच आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी रात्री घडली. फिरोज पठाण हे हाश्मीनगर भागात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. काल रात्री ४ अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरी घुसले. याचदरम्यान गाढ झोपेत असलेल्या फिरोज पठाण यांच्यावर या हल्लेखोरांनी भीषण हल्ला केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

ही संपूर्ण घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये कैद झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, ही हत्या जुन्या वादातून घडली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांचे संपूर्ण पथक आरोपींचा मागोवा घेत आहे. याप्रकरणी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिस अधिकारी म्हणाले. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR