गरीब-मध्यमवर्गीयांना संपविण्याचे षडयंत्र

नागपूर : देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यांना मारण्यासाठीच मोदी आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने षडयंत्र रचले असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुढच्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने डिझेलचे भाव दीडशे रुपये झालेले दिसतील. १७० रुपये पेट्रोल झालेले दिसेल. देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंधन तुटवडा नाही असे सरकार सांगत आहे. पण अनेक ठिकाणी विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. इंधनाचा तुटवडा आहे हे मान्यच केले पाहिजे. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे दिवस येणार आहेत. जनतेने सरकारच्या विश्वासावर कुठेही पैसे गुंतवू नयेत. कारण तो वापस येणार नाही. सरकारने बँकासुद्धा रिकाम्या केल्या आहेत. जनतेने पैसे सुरक्षित ठेवले पाहिजेत. रिझर्व्ह बँकेतील पैसे सरकारने काढून घेतले आहेत. देश सर्वच बाजूने संकटात आहे.

एसआयआरच्या नावाने मतदारांची नावे कमी करतायत
विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकांचा जीव जातोय याकडे सरकारचे लक्ष नाही. ते पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करतील आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर पडदा टाकण्याचे काम करतील. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर आम्ही काही बोलणार नाही. पण निवडणूक आयोग भाजपचा दलाल म्हणून काम करत आहे. त्यांनी आमच्यावर हवी ती कारवाई करावी. एसआयआरच्या नावाने ज्या राज्यात सरकार येणार नाही त्या राज्यातील मतदारांची नावे कमी केली जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकार भावना भडकवतेय
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जनता महागाईने त्रस्त आहे आणि सरकार तणाव निर्माण करत आहे. महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जाऊ नये यासाठी हे सर्व काही सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवत लोकांना मारायचे, त्याचे राजकारण करायचे काम सरकारकडून सुरू आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणे सत्ताधा-यांचा धंदा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करणे हा सत्ताधा-यांचा धंदाच झाला आहे. सरकारने जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला पाहिजे. यांनी संविधानाची भाषा करूच नये. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सरकारमधील मंत्री हे असंवेदनशील आहेत. ते मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहे, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारकडून आश्वासनांची धूळफेक
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे सातत्याने आंदोलन करत आहेत, पण सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहे. जीआर काढले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. मनोज शिरूरे अटकेत;CBI ची मोठी कारवाई
03:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. शिरूरेनं मोटेगावकरला पेपर विकला?;मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
03:01
Video thumbnail
Latur|तोंडार पाटीजवळ दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग;अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
01:19
Video thumbnail
इंडिगो पायलटच्या कॅमेऱ्यात कैद भारत-पाक सीमेचे विलोभनीय रूप, रात्रीच्या झगमगाटाचा व्हिडिओ व्हायरल!
00:33
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42
Video thumbnail
Nanded|नांदेड विभागात एसटीचा महिन्याला 50 लाखांचा वाढीव भार;तोट्यातील एसटीवर इंधन दरवाढीचे संकट
02:57

Latest news