नीट परीक्षेमध्ये आता ‘कूलर घोटाळा’

नागपूर : नीट परीक्षेला २०१३ पासून सुरुवात झाल्यानंतर ही परीक्षा वादाच्या भोव-यात अडकली आहे. पेपरफुटीचा तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला. त्यामुळे नीट परीक्षेतील पारदर्शकतेबाबत संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यावर्षी घेण्यात आलेली परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. मात्र तीन मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे गाजत असली तरी या परीक्षेत कूलर घोटाळा झाल्याचे नवीन आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.

१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कलेक्टर नागपूर यांनी सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी सांगितले की, उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून सर्व केंद्रात प्रत्येक खोलीत कूलर लावण्याची आज्ञा दिली. मात्र कूलरचा खर्च कोण देईल असा प्रश्न उपस्थित केला गेला. यावर शहरातील परीक्षेचे व्यवस्थापक आणि निवासी जिल्हाधिकारी यांनी ‘नीट’कडून रक्कम मागवून देऊ तुम्ही सोबत देयके जोडा अशा सूचना दिल्या होत्या.

आता पैसे देण्यास नकार
त्यानुसार परीक्षा केंद्र असणा-या महाविद्यालयांनी कूलरची सुविधा केली. लग्नाचे दिवस असल्याने कूलर मिळणे अशक्य होते. त्यामुळे प्रति दिवस २००० ते अडीच हजार रुपये याप्रमाणे भाड्याने कूलर आणले. यानंतर प्रत्येक महाविद्यालयाचे कूलरचे भाडे ३० हजार ते ३५ हजार रुपये झाले आहे. या कूलरच्या भाड्याची देयके आणि न्यायालयाचा आदेश सोबत जोडण्यात आलेला आहे. मात्र परीक्षेची व्यवस्था पाहणा-या ‘नीट’च्या व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्र चालकांची देयके मंजूर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या कूलरच्या भाड्याचा भार परीक्षा केंद्रांवर पडलेला आहे. न्यायालयाच्या याचिकेमध्ये परीक्षा केंद्र यांना कुठलेही आदेश देण्यात आलेले नव्हते. कूलर लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि स्थानिक व्यवस्थापनाला देण्यात आले होते. आता या परीक्षा केंद्र असणा-या महाविद्यालयांच्या कूलरच्या भाड्याची देयके ‘नीट’ कडून काढून देण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांची आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी पुढाकार घेऊन देयके मंजूर करून द्यावी अशी मागणी होत आहे.

‘नीट’मधील नेमका घोटाळा काय?
देशभरात तसेच महाराष्ट्रात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण अत्यंत चर्चेचा विषय बनलेला आहे, ज्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत तपास सुरू आहे आणि काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे. मात्र परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी, कॉपी, बनावट उपस्थिती आणि निकालांमध्ये संशयास्पद हस्तक्षेप यांसारखे प्रकार केवळ नीट परीक्षेपुरते मर्यादित नसून महाराष्ट्रातील इतर अनेक स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांपर्यंत हे जाळे पोहोचल्याची गंभीर शंका निर्माण होत आहे.

विद्यार्थ्यांची शाळेत अनुपस्थिती
राज्यात अनेक खासगी अकॅडमी आणि कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी दिवसभर कोचिंग क्लासमध्ये शिकत असतानाही त्यांची उपस्थिती ग्रामीण भागातील किंवा नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळा/महाविद्यालयांमध्ये दर्शविली जाते. प्रत्यक्षात विद्यार्थी त्या शाळांमध्ये उपस्थित राहत नाहीत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news