33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रदादांचा डाव फिरला

दादांचा डाव फिरला

इंदापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदार संघात नुकतेच मतदान पार पडले. या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.९७ टक्के मतदान झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झाले. यामध्ये खडकवासल्यात ५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.

शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची गणितं कालच्या मतदानामुळे पूर्णपणे विस्कटली. यामुळे अजित पवार गटाची धाकधूक वाढली आहे. यामुळे निकाल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वांधिक मतदारसंख्या खडकवासल्यात आहे. याठिकाणी भाजपचा आमदार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कुल मैदानात होत्या. खडकवासल्यातून कुल यांना ७० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे यावेळी देखील अजित पवारांनी याठिकाणी विशेष लक्ष दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR