24.3 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

नाशिक :
नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच शेतक-यांना आवश्यक मदत करण्यात यावी, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यात चाराटंचाई देखील निर्माण झाली आहे. यातच आता रबी हंगामातही पाण्याच्या अभावामुळे पुरेशा पेरण्या झालेल्या नाहीत. एकंदरीत जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती पाहता नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR