36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडादिल्लीने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली

दिल्लीने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली

दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आज दिल्ली कॅपिटल्सला धू धू धुतले… पण, शे होपने सीमारेषेवर अविश्वसनीय झेल घेत दिल्ली कॅपिटल्सला मोठी विकेट मिळवून दिली. १६ व्या षटकात संजूच्या विकेटनंतर सामन्याला कलाटणी मिळाली, त्यात १८ व्या षटकात कुलदीप यादवने ४ धावा देत २ विकेट्स घेऊन सामना पूर्ण फिरवला. त्यानंतर आरआर ला पुनरागमन करणे अवघड झाले आणि डिसी ने मॅच जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. डीसीचा हा १२ सामन्यांतील सहावा विजय ठरला आणि १२ गुणांसह ते अजूनही शर्यतीत आहेत.

यशस्वी जैस्वाल ( ४) अपयशी ठरल्यानंतर संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी आरआर चा डाव सावरला. पण, बटलरच्या विकेटसाठी रिषभने अक्षर पटेलला आणले. बटलरने चौकार-षटकार खेचूनही अक्षरने पाचच्या चेंडूवर बटलरचा ( १९) त्रिफळा उडवला. संजू उभा राहिला आणि तो असेपर्यंत राजस्थानचा विजय निश्चित मानला जात होता. संजू व बटलर यांनी ३३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली होती. संजूने रियान परागसह ( २७) ३६ धावा जोडल्या, परंतु वेग मंद होता. परागची विकेट घेणाऱ्या रसिखच्या पुढच्या षटकात संजूने ६,४,६ असे फटके खेचले आणि त्यानंतर शुबम दुबे याच्यासह इशांत शर्मालाही ४,४,६ असे झोडले.

संजूने दिल्लीच्या गोलंदाजांवर दडपण वाढवले होते. १६ व्या षटकात संजूने मिड ऑनवरून खणखणीत फटका मारला आणि शे होपने अप्रितम झेल घेतला. होपने काही इंचाच्या फरकाने स्वतःला सीमारेषेला टच होण्यापासून वाचवले. तिसऱ्या अम्पायरने बाद देताच संजूने नाराजी व्यक्त केली. संजूला ४६ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर दिल्लीने सामना फिरवला. शुभम दुबे १२ चेंडूंत २५ धावा करून बाद झाला. १८ व्या षटकात कुलदीप यादवने ४ धावा देत २ विकेट्स घेऊन सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली. १२ चेंडूंत ३७ धावा फफ ला करायच्या होत्या आणि रोव्हमन पॉवेल ही शेवटची आशा होती. ६ चेंडूंत २९ धावा फफ ला करायच्या होत्या आणि मुकेशने पॉवेलचा ( १३) त्रिफळा उडवला. फफ सा ८ बाद २०१ धावा करता आल्या आणि दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, जॅक फ्रेझर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्या आक्रमक फलंदाजीने ऊउ चा पाया मजबूत केला. जॅकने २० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा कुटल्या. त्यानंतर अभिषेकने ३६ चेंडू, ७ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या. गुलबदीन नैब ( १९) व त्रिस्तान स्तब्स यांची ४५ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. शे होप ( १) दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. अक्षर पटेल ( १५) आणि रिषभ पंत ( १५) मोठी खेळी नाही करू शकले. त्रिस्तान स्तब्सने २० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा करून आपली कामगिरी चोख बजावली. दिल्लीने ८ बाद २२१ धावा उभ्या केल्या. आर अश्विनने ४-०-२४-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. युझवेंद्र चहलने ( १-४८), ट्रेंट बोल्ट ( १-४८) व संदीप शर्मा ( १-४२) हे महागडे ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR