33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेवेळी सर्वांचे ‘आय लव्ह यू’

लोकसभेवेळी सर्वांचे ‘आय लव्ह यू’

जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होते, असे विधान गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांचा नेमका रोख कुणाकडे होता, याची चर्चा सुरू झाली आहे.

जळगावमध्ये भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यावेळी गुलाबराव पाटील यांनी हे विधान केले. त्यावेळी स्मिता वाघ आणि भाजपा नेते गिरीश महाजन हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्या आपल्या निवडणुकीवेळी भाऊ सगळे आपल्या विरोधात असतात. मात्र खासदारकीच्या दुश्मन के दुश्मन सुद्धा दोस्त बनून जातात. बघा आता शिरीशदादा आणि अनिलभाऊ आय लव्ह यू, तिकडे गेलो तर किशोर आप्पा आणि अमोल शिंदे आय लव्ह यू, गुलाबराव पाटील आणि चंद्रशेखर अत्तरडे आय लव्ह यू. ही गटार, वॉटर, मीटरची निवडणूक नाही आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR