31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रटपाली मतदानाची व्यवस्था सुरू

टपाली मतदानाची व्यवस्था सुरू

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचा-यांसाठी १४, १५ आणि १६ मे रोजी तीन दिवस टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार संघातील नोंदणीकृत मतदारांपैकी अत्यावश्यक सेवेतील पोलिस अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मत पत्रिकेसाठी नमुना १२ /१२ ड आणि ईडीसी कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना १२ अ मध्ये अर्ज केला होता. जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत.

अशा १२ अ च्या पात्र कर्मचा-यांना ईडीसी प्रमाणपत्र वितरण करणे. नमुना १२ अ/ नमुना १२ ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन टपाली मत पत्रिकांच्या मतदानाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर बॅडमिंटन हॉल, पुरुषांची जीम तळमजला, डोंबिवली क्रीडा संकुलातील जलतरण तलावासमोर टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ मे रोजी दरम्यान सलग तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत उपलब्ध आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR